दरवर्षी 8 मार्चला साजरा होणारा "आंतरराष्ट्रीय महिला दिन" हा केवळ स्त्रीच्या हक्कांचा उत्सव नाही, तर तिच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याची आठवण करून देणारा दिवस आहे. महिलांचे जीवन अनेक भूमिका, जबाबदाऱ्या आणि टप्प्यांनी भरलेले असते. या प्रत्येक टप्प्यावर शरीर, मन आणि आत्मा यांचे संतुलन राखणे आवश्यक असते. हे संतुलन राखण्यासाठी "वेलनेस व्हील" (Wellness Wheel) हा एक उपयुक्त मार्गदर्शक ठरतो.
माझ्या Health आणि Wellness च्या करीअर व वयक्ततीक प्रवासा चया 8 वर्षात अनेक client सोबत काम करुन आरोग्य व वेलनेस ही कन्सेप्ट फक्त वरवरचे शारीरिक पातळीवर होणारे बदल नसुन तुमचा आहार, तुम्ही काय पाहता, तुम्ही काय ऐकता, तुम्ही काय वाचता, तुम्ही ज्या लोकांच्या आजूबाजूला राहता... तुम्ही तुमच्या शरीरात भावनिक, अध्यात्मिक आणि मानसिक दृष्ट्या ज्या गोष्टी टाकता या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे तुम्ही व तुमचे स्वास्थ्य. स्वास्थ्य म्हणजे केवळ शारीरिक तंदुरुस्ती नव्हे, तर मानसिक, सामाजिक, भावनिक, व्यावसायिक, आध्यात्मिक आणि पर्यावरणीय संतुलन राखणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तर मैत्रिणींनो एक आरोग्य प्रशिक्षक म्हणून, मी माझ्या वेलनेस व्हील (Wellness Wheel) चा कसा समतोल ठेवला, याचा हा अनुभव.
वेलनेस व्हील म्हणजे काय?
वेलनेस व्हील हा संपूर्ण आरोग्य आणि जीवनशैली संतुलनाचा सिद्धांत आहे. यात सात महत्त्वाचे घटक समाविष्ट आहेत, जे संपूर्ण जीवनाचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहेत:
शारीरिक आरोग्य (Physical Wellness)
मानसिक आरोग्य (Emotional Wellness)
बौद्धिक आरोग्य (Intellectual Wellness)
आध्यात्मिक आरोग्य (Spiritual Wellness)
सामाजिक आरोग्य (Social Wellness)
व्यावसायिक आरोग्य (Occupational Wellness)
आर्थिक आरोग्य (Financial Wellness)
महिलांनी या सातही क्षेत्रांमध्ये संतुलन राखले, तर त्यांचे संपूर्ण जीवन निरोगी आणि आनंदी राहील. चला, प्रत्येक घटक समजून घेऊ आणि त्यासाठी आवश्यक उपाय जाणून घेऊ.
शारीरिक आरोग्य (Physical Wellness)
महिलांच्या आरोग्यावर तिच्या जबाबदाऱ्या आणि जीवनशैलीचा मोठा परिणाम होतो. शारीरिक आरोग्यासाठी खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत:✅ नियमित व्यायाम: दररोज किमान 30 मिनिटे योग, चालणे किंवा कोणत्याही शारीरिक हालचाली कराव्यात.
✅ संतुलित आहार: प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि मिनरल्सयुक्त आहार घेणे.
✅ पाणी सेवन: दिवसाला ८-१० ग्लास पाणी प्यावे.
✅ पुरेशी झोप: किमान 7-8 तासांची शांत झोप आरोग्यासाठी आवश्यक आहे.
✅ नियमित आरोग्य तपासणी: हृदय, हाडे, रक्तदाब आणि हार्मोन चाचण्या वेळोवेळी करून घ्याव्यात.
मानसिक आरोग्य (Emotional Wellness)
भावनिक स्थैर्य राखणे हे महिलांसाठी अत्यंत आवश्यक आहे, कारण त्यांच्यावर कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात असतात.✅ स्वतःला वेळ द्या: तुमच्या आवडीचे छंद जोपासा, संगीत ऐका, पुस्तक वाचा.
✅ भावनांचे योग्य व्यवस्थापन: तणाव, चिंता किंवा नैराश्य यावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
✅ मदत घेण्यास संकोच करू नका: गरज वाटल्यास समुपदेशकाचा सल्ला घ्या.
बौद्धिक आरोग्य (Intellectual Wellness)
बौद्धिक प्रगती म्हणजे आपल्या ज्ञानाची वाढ आणि सतत नवीन गोष्टी शिकण्याची तयारी.✅ नवीन कौशल्ये शिका: डिजिटल स्किल्स, भाषा किंवा हस्तकला शिकण्याचा प्रयत्न करा.
✅ वाचनाची सवय लावा: चांगली पुस्तके, वर्तमानपत्रे वाचण्याने विचारशक्ती विकसित होते.
✅ समाजात चर्चांमध्ये भाग घ्या: वेगवेगळ्या गटांमध्ये जाऊन संवाद साधा.
आध्यात्मिक आरोग्य (Spiritual Wellness)
आध्यात्मिक आरोग्य म्हणजे आपले अंतरिक समाधान आणि जीवनाचे उद्दिष्ट समजून घेणे.✅ ध्यान (Meditation) आणि प्रार्थना: मानसिक शांतीसाठी ध्यान किंवा योग करणे फायदेशीर ठरते.
✅ सकारात्मकता जोपासा: नकारात्मक विचारांना दूर ठेवा आणि जीवनात आनंद शोधा.
✅ जीवनाचे उद्दिष्ट ठरवा: तुम्हाला आयुष्यात काय हवे आहे हे ठरवा आणि त्यासाठी प्रयत्न करा.
सामाजिक आरोग्य (Social Wellness)
स्त्री ही कुटुंब आणि समाजाचा केंद्रबिंदू असते, त्यामुळे तिच्या सामाजिक आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.✅ स्नेही आणि कुटुंबीयांशी जोडलेले रहा: तुमच्या प्रियजनांशी मनमोकळा संवाद साधा.
✅ सकारात्मक नाती जोडा: ज्या लोकांमुळे तुम्हाला आनंद मिळतो त्यांच्यासोबत राहा.
✅ समाजकार्य करा: गरजूंना मदत करा, महिलांसाठी कार्यरत संस्थांमध्ये सहभागी व्हा.
व्यावसायिक आरोग्य (Occupational Wellness)
महिलांनी स्वतःच्या करिअरमध्ये समाधान मिळवणे आणि प्रगती करणे गरजेचे आहे.✅ करिअरमध्ये स्पष्टता ठेवा: स्वतःला कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे हे निश्चित करा.
✅ काम-जीवन संतुलन ठेवा: कुटुंब आणि करिअर यामध्ये समतोल राखा.
✅ नवीन संधी शोधा: स्वतःच्या क्षमतांचा वापर करून नवीन संधी ओळखा आणि त्याचा लाभ घ्या.
आर्थिक आरोग्य (Financial Wellness)
महिलांनी आर्थिक स्वावलंबन प्राप्त करणे हे स्वतंत्र आणि सुरक्षित जीवनासाठी महत्त्वाचे आहे.✅ संचय आणि गुंतवणूक: बचत करण्याची सवय लावा आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.
✅ स्वतःचे उत्पन्नाचे साधन निर्माण करा: छोट्या व्यवसायाची सुरुवात करा किंवा नवीन कौशल्ये शिकून अर्थार्जन करा.
✅ आर्थिक साक्षरता मिळवा: बँकिंग, गुंतवणूक आणि टॅक्स व्यवस्थापन याबाबत माहिती मिळवा.
महिलांचे शरीर वय, वजन, शारीरिक सक्रियता आणि जीवनशैलीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या पोषक घटकांची मागणी करते. इथे मी एक आहार तज्ज्ञ म्हणून काही विशेष आहारद्रव्ये आहारात घेण्याची शिफारस करते.
माझ्या महीला clients नी या superfood चा अनुभव घेतला असून त्यांना Hormonal Balance साठी, तणाव कमी करण्यासाठी, वजन नियंत्रणासाठी, ऊर्जा वाढविण्यासाठी, जीवनशैली आजार reverse करण्यासाठी या superfood चार चांगलाच फायदा झाला आहे आणखी हे superfood महिलांच्या संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.
१. शतावरी – स्त्री आरोग्यासाठी अमृत,२. अश्वगंधा – तणावमुक्त आणि ऊर्जा वाढवणारे औषध,
३. अलसी (Flaxseeds) – हृदय व संप्रेरकांसाठी गुणकारी,
४. गव्हांकुर (Wheatgrass) – रक्तशुद्धी आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी,
५. बदाम आणि खजूर – हाडांसाठी आणि उर्जेसाठी पोषणद्रव्ययुक्त,
६. हळद – नैसर्गिक प्रतिजैविक (Natural Antibiotic) आणि त्वचेच्या आरोग्यासाठी वरदान,
७. आवळा – सर्वोत्कृष्ट अँटीऑक्सिडंट आणि पचनासाठी फायदेशीर.
८.डाळिंब: हे व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि पॉलिफिनोल्सने समृद्ध होते. हे हायपर-टेन्शन आणि हृदयाच्या समस्यांमधे खूप उपयुक्त आहे. एक अतिशय चांगला अँटी-ऑक्सिडेंट असल्याने स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यास मदत होते.
९.जटामासी: ताणतणाव दूर करते आणि मनाला शांती मिळते. रजोनिवृत्ती दरम्यान महिलांमध्ये शरीर आणि मन खूप तणावग्रस्त असतात. या काळात जटामासी खूप उपयुक्त आहे.
१०.राज-शिंबी; तुम्हाला मानसिक शांती देते. आपल्याला ताजे आणि दमदार ठेवते. तणावग्रस्त शरीरातील स्नायूंना आराम मिळतो. हाडांना आवश्यक कॅल्शियम आणि कॅल्शियमचे आवश्यक कोफेक्टर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. डायजेन-आयसोप्लॅव्हनमुळे हाडे कमी होण्यास कमी होते. आयसोप्लॅव्हन त्वचा सैल होऊ देत नाही.
महिला म्हणून आपल्याकडे अनेक भूमिका आणि जबाबदाऱ्या असतात, पण स्वतःच्या आरोग्याची आणि आनंदाची जबाबदारीही आपलीच आहे. वेलनेस व्हील च्या प्रत्येक घटकात संतुलन राखले, तर जीवन अधिक आरोग्यदायी आणि आनंदी होईल.
या महिला दिनी संकल्प करूया की, आपण स्वतःच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक आरोग्याकडे अधिक लक्ष देऊ आणि स्वतःला एक सशक्त, आत्मनिर्भर आणि आनंदी स्त्री बनवू! आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आरोग्यमय शुभेच्छा!!